Latest Sport Update | विराट कोहलीच्या चाहत्याने स्वतःला पेटवून घेतले | Lokmat Marathi News

2021-09-13 0

भारतात बॉलिवूडच्या कलाकारांनंतर नागरिकां मध्ये क्रिकेटर्सची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी ते काहीही करायला तयार असतात. विराट कोहलीच्या अशाच एका चाहत्याने स्वत:ला जाळून घेतलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट स्वस्तात बाद झाल्यानंतर नाराज होऊन या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं आहे. मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव बाबूलाल बैरवा आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूलाल घरी टीव्हीवर हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा कसोटी सामना पाहत होते. या सामन्यात कर्णधार विराट कोहली अवघ्या ५ धावांवर बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर बाबूलाल यांनी स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. मात्र त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या अंगावर कपडे टाकून आग विझवली. सध्या त्यांच्यावर स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews